भेंडी लावून 14 दिवस झाले आहे.रसायन खत वापरावे का टाकायचे असल्यास कोणते व प्रमाण किती. फवारणीतुन वापरायचे असल्यास कोणते.
सध्या १९:१९:१९ हे विद्राव्ये खत @५० ग्रॅम + बायोस्टीमुलंट @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रसशोषक कीड नियंत्रण करिता शेतात एकरी @५० चिकट सापळे प्रस्तापित करावे. पाने खाणारी व फळ पोखरणारी किडीसाठी एकरी @१० कामगंध सापळे व @एक प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.