पानाखाली व फळावर अळी चा प्रादुर्भाव आहे. नियंत्रणात आणण्यासाठी काय करावे
प्रकाश सापळा @१, कामगंध सापळा @१०/एकर याप्रमाणे वापरावे. शेतात एकरी @२५-३० पक्षी थांबे उभी करावी.
जर किडींची संख्येने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल (१० पतंग/सापळा किंवा एक अळी/ मीटर लांबी) तर खालील शिफारस केलेली कीटकनाशके वापरावीत.
इमामेक्टीन बेन्झोएट ५%@@१० ग्रॅम , टाकुमी @१० ग्रॅम , कोराजन @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.