या बागेचा मृग बहार धरायचा तर काय काय करावे लागेल

दोन वर्षापासुन मी बाग धरलेली नाही तरि आता धरायाचि आहे काय करावे लागेल
जसे की रेस्ट मधे कुठली खते द्यावी लागेल
फवारणी नियोजन जेने करुन माल चांगला ळागेल

1 Like

आता सध्या बाग स्वच्छ करून घ्या त्यात वाळलेल्या फांद्या छाटणी करून घ्या, पडलेली फळे काढून नष्ट करा.
छाटणी केलेल्या ठिकाणी १०% बोर्डो पेस्ट लावावे.
नंतर त्याच दिवशी १% बोर्डो पेस्टची फवारणी करावी.
एप्रिल महिना पूर्ण बाग ताणावर ठेवावे.

बेसल डोस कोणता द्यावा

शेंद्रीय खत व्यवस्थापनात बेसल डोसमध्ये २० किलो शेणखत + २ किलो गांडूळ खत + २ किलो निंबोळी पेंढ/प्रति झाड याप्रमाणे टाकावे.
रासायनिक खत व्यवस्थापनात ५०० ग्रॅम युरिया + ४०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट + ३५० ग्रॅम पोटॅश + कॅल्शियम (जिप्सम) ५०० ग्रॅम व मॅग्नेशियम ८०० ग्रॅम/झाड याप्रमाणे मातीआड मिसळून द्यावे.
वरीलप्रमाणे नियोजन केल्यानंतर पाणी व्यवस्थापन करावे.