कलिंगड

कलिंगड लागवड करून 43 दिवस झाले आहे कलिंगड ला फुले व कळी लागले व सेटिंग होण्याकरता त्यासाठी कोणती फवारणी व खते द्यावी

1 Like

सध्या ०.५२.३४ @५ किलो + बोरॉन @५०० ग्रॅम + सीवीड अर्क @१ लिटर /२०० लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी ठिबक द्वारे सोडावे.

३-४ दिवसांनी कॅल्शिम नायट्रेट @५ किलो + १३.००.४५ @ ५ किलो/२०० लिटर लिटर पाण्यात मिसळून प्रति एकरी ठिबक द्वारे सोडावे.

दिलेली खते वेलींना वेळेवर उपलब्ध व्हावे म्हणून पीएसबी व केएसबी @१ लिटर + ४ किलो काळा गुळ एकत्र मिसळून @२०० लिटर पाण्यात मिसळून रात्र भर भिजत ठेवावे. व दुसऱ्या दिवशी ठीबकद्वारे सोडावे.

कीड नियंत्रणकरिता शेतात एकरी @१० फळ माशी ट्रॅप प्रस्थापित करावे. व तसेच एकरी @५० निळे पिवळे चिकट सापळे लावावे.