जुनी व वाळलेली पाने सरी मध्ये टाकून घ्यावे. एकरी @ १०० किलो युरिया + १०० सिंगल सुपर फॉसफेट + पाने कुजवणारे जीवाणू (वेस्ट डिंकपोजर) १० लिटर@/ प्रति एकरी याप्रमाणे पानावर टाकून घ्यावे.
खते टाकल्यास पाने कुजण्याची प्रक्रियेस गती मिळते.
वरीलप्रमाणे नियोजन केल्यानंतर छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीने रोटावेटर मारून घ्यावे. व नंतर सरी मध्ये पाणी द्यावे.
पाणी दिल्यांनतर वापसा आल्यानंतर हलकी मशागत करावी.