पहिल्यांदाच मोहर आहे चांगले फळ सेटिंग होण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी

pest

1 Like

आंबा पिकात मोहर येणाच्या कालावधीत भुरी तुडतुडे व मोहर गळणे या मुख्य समस्या असतात.
नियंत्रण उपाय:
Imidaclopride १७.८%@१० मिली + सल्फर ८०%/ हेक्झाकोनझोल ५%@३० मिली + प्लानोफिक्स @३ मिली/ १० लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी.

आंबा मोहर

तापमानातील चढ-उतारामुळे आंब्याला पुन्हा पुन्हा मोहोर येतो. साधारणपणे ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये मोहोर येऊन फळे मोठी होऊन जानेवारीत अचानक थंडी पडल्यास त्याच मोहोराच्या बगलेतून पुन्हा मोहोर येतो. अशा वेळेस पहिल्या मोहोरातील मोठी फळे अन्नसाठा बंद झाल्यामुळे गळून पडतात.
नैसर्गिक गळ रोखण्यासाठी नॅप्थेलिक ऍसेटिक ऍसिड **NAA (प्लनोफ़िक्ष)@**3 मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करवी. काही वेळेस सायटोकायनिन या संजीवकामुळे फळगळ थांबविणे शक्‍य होऊ शकते. कारण सायटोकायनिनमुळे ऍबसेसिक ऍसिड या वाढ निरोधकाची उत्पत्ती झाडामध्ये थांबविली जाऊन फळाच्या देठाभोवती होणारी ऍबसेसिक पेशींची वाढ बंद होते. पर्यायाने फळ गळ रोखता येते.