भुईमूग लागवड कधी करावी व जात कोणती उत्तम आहे
उन्हाळी लागवडी साठी टीएजी- २4 (बॉम्बे सुपर) उन्हाळी लागवडीसाठी उत्तम आहे.
उन्हाळी लागवड १५ फेब्रूवारी पर्यंत करता येईल.
खत व्यवस्थापन
पेरणीवेळी प्रतिएकरी युरिया २५ किलो + सिंगल सुपर फॉस्फेट १२५ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ३५ किलो + जिप्सम १५० ते २०० किलो याप्रमाणे द्यावे.
पेरणीवेळी ४-५ किलो झिंक सल्फेट तसेच बोरॅक्स २ किलो प्रतिएकरी द्यावे.
पीक आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत पुन्हा जिप्सम १५० ते २०० किलो प्रतिएकर याप्रमाणे द्यावे. जिप्समच्या वापरामुळे शेंगा चांगल्या पोसून, उत्पादन वाढण्यास मदत होते.
कीड व रोग व्यवस्थापनसाठी आपल्या अॅप मधील कीड व रोग संबधित लायब्ररीचा वापर करून व्यवस्थापन शकता.