वांगे झाड सुकू लागले

काही दिवसापासून वांगे तोडा सुरू आहे , परंतु काही झाडे पूर्ण सुकू लागले , तरी उपाय सुचवा ही विनंती

मर रोगाची लक्षणे दिसत आहे. नियंत्रणासाठी
ट्रायकोड्रामा या जैविक बुरशीचा वापर एकरी @२ किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात @१०० किलो मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे.
विटावॅक्स पॉवर (Carboxin 37.5% + Thiram 37.5% DS)@३० ग्रॅम+ ह्युमिक असिड @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक ओळीत ड्रेंचींग करावी. ड्रेंचींग पाठीवरच्या पंपाच्या सहायाने नोझल ढिली करून करावी.

1 Like

:pray:t2:।। :hibiscus:श्री स्वामी समर्थ :hibiscus:।। :pray:t2:
सर खूप खूप आभार