टरबूज

मला एक एकर टरबूज कलिंगड लागवड करायची आहे त्यासाठी कोणता बेसल डोस कोणता घ्यावा त्यानंतर मल्चिंग करायचे आहे माहिती द्यावी

सेंद्रिय खतामध्ये ८-१० टन चांगले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
बेडमध्ये १०० किलो निंबोळी पेंड मातीत मिसळून द्यावे.

बेसल डोसमध्ये युरिया@५० किलो +सुपर फॉंस्फेट @१५० किलो(३ बॅग) + पोटॅश १ बॅग
किंवा डीएपी @२ बॅग + २५ किलो युरिया + पोटॅश १ बॅग
किंवा १०:२६:२६ @२.५ बॅग +२५ किलो युरिया
यापैकी कुठलेही एका कॉम्बिनेशनचा वापर करा.

लागवडीनंतर ६-७ दिवसांनी @५ किलो १९:१९:१९ + जर्मिनेटर @१ लिटर/२०० लिटर पाण्यात मिसळून/एकरी सोडावे.

ओके सर