घाटे अळी

या अळी वर शेंद्रिय नियंत्रण काय करावे

2 Likes

शेंद्रीय कीड व्यवस्थापनात फुल लागणीच्या वेळेस व घाटे ५०% भरणीच्या वेळेस ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
बिव्हेरिया बॅसियाना/ मेटारायझिम अॅनिसोपिली@५ मिली/ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
त्याचबरोबर शेतात एकरी@२५ पक्षी थांबे व १० कामगंध सापळे लावावे.
मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ट करावी.