जीवामृत व बिजामृत कसे बनवावे

जीवामृत व बिजामृत कसे बनवावे सविस्तर सांगा.

जीवामृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य ** ** :

१) देशी गाईचे शेण १० किलो

२)देशी गाईचे गोमुत्र १० लिटर

3)डाळीचे पीठ ( तूर ,मुग ,हरभरा या पैकी ) २ किलो

४) २ किलो गुळ

५) १८० लिटर पाणी

६ ) प्लास्टिक टाकी (२०० लिटर क्षमता असलेली )

**कृती **

२०० लिटर क्षमतेचा ड्रम घ्यावा. सावलीच्या ठिकाणी वरील सर्व साहित्य एकत्रित ड्रम मध्ये मिसळावे व झाकून घ्यावे मिश्रण दररोज सकाळ- संध्याकाळ काठीच्या सहाय्याने उजवीकडून डावीकडे तसेच डावीकडून उजवीकडे ढवळावे. अशी क्रिया ५-७ दिवसापर्यंत करत राहावे ७ दिवसानंतर (एका आठवड्यानंतर ) जीवामृत वापरण्यास तयार होते.

**वापरण्याचे प्रमाण ** :

२०० लिटर तयार झालेले द्रावण (जीवामृत) पिकांना पाणी देताना सरी (पाटाद्वारे ) बरोबर जमिनीत ओल असताना पिकाच्या मुळाशी अवल्नी घालावी. ( जीवामृत प्रत्येक १० दिवसांनी आवळणी घातल्यास जमिनीची सुपीकता वाढते)