हरभरा

अजून पर्यंत हरभरा पिकातील मर रोग थांबत नाही उपाय सुचवा

यावर्षी भरपूर पाऊस झाल्याने मर रोगाची बुरशीची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
जमिनीत भरपूर ओल असेल तर पाट पद्धतीने पाणी देणे टाळावे.
१) मर लागत असलेली व वाळत असलेली रोपे काढून टाकावी त्यामुळे निरोगी रोपावर प्रसार होणार नाही.

२) ट्रायकोड्रामा या जैविक बुरशीचा वापर एकरी @२ किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात @१०० किलो मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे.

३) विटावॅक्स पॉवर (Carboxin 37.5% + Thiram 37.5% DS)@३० ग्रॅम+ ह्युमिक असिड @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक ओळीत ड्रेंचींग करावी. ड्रेंचींग पाठीवरच्या पंपाच्या सहायाने नोझल ढिली करून करावी.

ज्या ठिकाणी मर रोगाची लक्षणे दिसत असतील अशा ठिकाणी ताकत (हेक्साकोनाझोल 5% + कॅप्टन 70% WP )**@**४० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी.