ज्वारी

ज्वारी पिकात सेंडे खराब होत आहे

1 Like

१) शेतात पिक उगवणीनंतर १० दिवसांनी पतंग मोठ्या प्रमणात पकडण्यासाठी एकरी @२० कामगंध सापळे प्रस्थापित करावे.
२) शेतात ठिकठिकाणी एकरी@२५ पक्षी थांबे सापळे प्रस्थापित करावे.
३) किडीची अंडी पुंज, समूहातील अळ्या हाताने वेचून नष्ट करावी.
४) विषाणूजन्य किटकनाशक (एस.एल. एन पी.व्ही) ५०० एल. ई. @१५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५) किडीने आर्थिक संकेत नुकसानीची पातळी ओलांडल्यास खालीलपैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी.
a) डेलीगेट (स्पिनोटेरम ११.७% एससी.)@३ मिली
b) अंप्लीगो (क्लोराँट्रानिलिप्रोल ९.३% + लॅम्बडा-सायहॅलोथ्रिन ४.६% झेड.सी.)@५ मिली
c) कोराजन (क्लोराँट्रानिलिप्रोल१८.५% एससी.)@३ मिली
d) एव्हीसिन्ट (मॅमेक्टिन बेंझोएट 5% + लुफेन्युरॉन 40% WG)@५ ग्रॅम
वरील सर्व मात्रा १० लि. पाणीसाठी देण्यात आलेली आहे.