लष्करी अळीचे प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळी सुरुवातीला कोवळी पाने खरडून खातात त्यामुळे पानावर पांढरी चट्टे पडतात.
एकात्मिक नियंत्रण
१) आकाराने मोठ्या दिसणाऱ्या अळ्या हाताने वेचून नष्ट करावी.
२) शेतात “टी” आकाराचे एकरी @२० पक्षी थांबे उभी करावी.
३) अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी एकरी@१० कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
४) हेक्टरी @१ प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
५) जर किडीने आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ओलांडली (५ पतंग/सापळा/सलग तीन रात्र) असेल तर खालीलप्रमाणे फवारणीचे नियोजन करावे.
अ) इमामेक्टीन बेन्झोएट ५% (मिसाईल, प्रोक्लेम) @ १० ग्रॅम किंवा क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.