कांदा पिक व्यवस्थापन
सध्या १ ते ३ डिसेंबर पर्यंत व संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज सांगण्यात आलेले आहे. अशा परिस्थिती ढगाळ वातावरण व पाऊस पडत असलेल्या भागात कांदा पिकामध्ये मररोग, पर्ण करपा (पर्पल ब्लॉच) अंन्थ्रॅकनोज व पीळ पडणे या रोगाची लक्षणे दिसू शकतात. अशावेळी कांदा पिकात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
उपाय
१) रोको (थायोफेनेट मिथाइल ७० % WP)@२० ग्रॅम + ब्लू कॉपर (कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० WP)@ ३० ग्रॅम + सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) स्कोर (डायफेन्कोनॅझोल २५% EC) @१० मिली + कवच (क्लोरोथॅलोनिल ७५% WP) बायोस्टीमु लंट + ३० मिली+ सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) कॅब्रियोटाॅप (मेटीराम ५५% + पायराक्लोस्ट्रोबिन ५% WG)@१५ ग्रॅम + बायोस्टीमु लंट + ३० मिली+ सिलिकॉन बेस स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.**
**