बोंड आळी आलेली आहे

कापसावर की खुप बोंड आळी आलेले आहे कशाची फवारणी करावी

आता सध्या फवारणीचे नियोजन करत असाल तर हि कीड १०० % नियंत्रण होणार नाही.

खालीलप्रमाणे नियोजन करता येईल.
पिकामध्ये एकरी @२० कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास पुढील येणाऱ्या पिढीवर अटकाव आणता येईल.
डोमकळी ग्रस्त फुले तोडून नष्ठ करावी.
सध्या क्लोराँट्रानिलिप्रोल ९.३% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ४.६% झेडसी (अम्प्लिगो)@५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील फवारणी नियोजना नंतर ८-१० दिवसांनी फेनप्रोपॅथ्रिन १०% (डेनिटॉल) @३० मिली + निंबोळी अर्क @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.