कापूस फरतळ

सर मला कापूस पिकाचे फडताळ घ्यायचे आहे तरी भरपूर पाते लागतात आहे तरी कोणते खत व कोणते औषध द्यावे तसेच माझ्याकडे पोलो या जातीच्या औषध उरलेला आहे ते फवारणी घेतले चालेल का

इथून पुढे कापूस पिकाला भरपूर प्रमाणात पाते व फुले येतात व टिकतात सुद्धा. एकच अडचण आहे ती म्हणजे गुलाबी बोंडअळी.

गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. कीड व्यवस्थापन नाही झाल्यास फरदड घेऊन फायदा नाही.

एकात्मिक व्यवस्थापन
१)मोठ्या प्रमाणात पतंग पकडण्यासाठी एकरी @१५ कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
२) नियमित पिकांचे सर्वेक्षण करून डोमकळी ग्रस्त फुले तोडून नष्ट करावी.
३) फरदडचे नियोजन करत असताना नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान गुलाबी बोंडअळी हि कीड खूप मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात त्याकरिता प्रत्येक आठवड्यात फवारणी करणे गरजेचे आहे.

४) *फवारणी नियोजन:
अ)आता सध्या डेनिटाॅल ( Fenpropathrin १० % EC)@३० मिली + अबिक,एम-४५ (मोन्कॉझेब ७५%)@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ब) वरील फवारणी नंतर८-१० दिवसाच्या अंतराने अम्प्लीगो ( Chlorantraniliprole (१०%) + Lambda cyhalothrin (५%) Zc.)५ मिली + कॉनटाफ प्लस (Hexaconazole ५%)@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.