सध्याच्या परिस्थितीनुसार तुर पीक सल्ला

तुर फवारणी नियोजन

सध्या तूर पिक कळी निघण्याच्या ते फुल लागण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी, पानावर व फुलांवर जाळी तयार करणारी अळी या किडचा प्रादुर्भाव होतो. तसेच शेंग भरणी अवस्थेत पिसारी पतंग, शेंगा पोखरणारी अळी आणि शेंग माशी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण राहून बुरशीजन्य रोगांचा फुलोरा अवस्थेत प्रादुर्भाव होऊ शकतो.

वरील सर्व किडींच्या एकत्रित नियंत्रण करिता व रोग नियंत्रण करिता खालीलप्रमाणे फवारणीचे नियोजन करावे.

१)पहिली फवारणी: इमामेक्टीन बेन्झोट ५%@५ ग्रॅम + (प्रोक्लेम, इम-१, मिसाईल,सफारी,इमॅक्टो) १२:६१:००(विद्राव्ये खत) @५० ग्रॅम + प्रोपिनेब ७०% (अंट्राकॉल)@३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२)पहिली फवारणीच्या १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी क्लोरोपायरीफॉस २५ %(एकालक्स) किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५% (कोराजन) @३ मिली+ ०:५२:३४(विद्राव्ये खत) @५० ग्रॅम/१०/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

३) फुलांची संख्या वाढविण्यासाठी सुरुवातीला स्वतंत्र फवारणीसाठी अमिनो असिड (अंबीशन,टाटा बहार, इसबिओन)@३० मिली+१२:६१:००@विद्राव्ये खत) @५० ग्रॅम/१०/१० लिटर पाण्यात मिसळून एक फवारणी करावी.

टिप: कंसात दिलेली नावे कीटकनाशकाची व्यापारी नावे आहेत.