पेरणी करतानी दोन ओळीतील अंतर दोन झाडातील अंतर

आपण आम्हाला आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीचा सल्ला दिलाय मला हरभरा लागवड करायची आहे मी पहिला प्रश्न केला होता मला बियाणे किती लागेल पण त्याचे अंतर सांगितल्या शिवाय पण ते बियाणे योग्य पडणार नाही तरी आपणास विनंती आहे योग्य अंतर सांगावे व आपण मला परत सेंदिय बीजप्रक्रिया कोण कोणत्या कल्चर ची करावी ते पण सांगा

हरभरा पिकाची पेरणीसाठी दोन ओळीतील अंतर व दोन झाडातील अंतर ३० सेमी व १० सेमी अशी शिफारस आहे त्यानुसार नियोजन करता येईल.

बीजप्रक्रिया
पेरणीपूर्वी एक दिवस अगोदर थायरम @३ ग्रॅम/किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
पेरणीपूर्वी एक तास अगोदर ट्रायकोडर्मा व्हिरीडी@५ ग्रम/किलो याप्रमाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

मुळकुज व मर रोगाची या वर्षी भरपूर समस्या उद्भवणार आहे. त्याकरिता ट्रायकोडर्मा व्हिरीडी@३-४ किलो /१०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिश्रण करून पेरणीपूर्वी शेतात पसरून द्यावे.