कांदा

पीळ पडलेला आहे, 1 महिन्याचे पीक आहे

2 Likes

कांदा पिकात रोपे अवस्थेत ट्वीस्टर (पीळ पडणे) या रोगाची खूप मोठी समस्या आहे.
या रोगाचे प्रसार पावसाच्या तीव्रतेवर कमी व जास्त पडण्यावर अवलंबून असते. तसेच अधून मधून पडणारे धुके यामुळे सुद्धा रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.

नियंत्रण
ट्रायसायक्लाझोल 75% WP ब्लास्टीन )@20 ग्रॅम/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरील फवारणीनंतर रोगाच्या तीव्रतेनुसार कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% WP(साफ) @30ग्रॅम/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.