गाजर

गाजर पेरावे किंवा सींपडावे खत कोनतेघालावे रोगा विनंती माहिती सांगा

गाजर लागवड दोन्ही पद्धतीने करता येते. सिंपडल्याने दोन रोपातील व दोन ओळीतील अंतर एकसारखे प्रमाणात राहत नाही. उलट अंतरमशागत करण्यास अवघड जाते.
पेरणी केल्यास दोन ओळीतील व रोपातील अंतर एकसमान राहून अंतरमशागतिची कामे करण्यास सोपी जाईल.

खत व्यवस्थापन
गाजर पिकाला हेक्टरी ८०:६०:६० (नत्र:स्फुरद:पालाश) अशी शिफारस आहे.
सोबतीला शेणखत असल्यास अधिक चांगले.

पेरणीचा कालावधी
रब्‍बी हंगामातील लागवड ऑगस्‍ट ते डिसेबर तर खरीप हंगामातील लागवड जून ते जूलै महिन्‍यात करतात.

कीड व रोग
कॅरोट व्वीवील,रूटफलाय, आणि तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होतो.
गाजराच्‍या पिकावर करपा, भुरी, मर पानांवरील ठिपके इत्‍यादी रोंगाची लागण होते.