कापूस पिकाची पाने पिवळी पडण्याची कारणे.
मागील १५ दिवसापासून सारखा पाउस पडत आहे. आपण पिंकाना जी खते दिलेली होती ती खते पावसामुळे वरच्या थरावरून खालच्या थरावर जाऊन बसली आहे म्हणजेच लिच ऑउट झाली आहे.
म्हणजेच मुळाजवळ जी खते उपलब्ध होती खालच्या थराला जाऊन बसली आहे. त्यामुळे पिकांना अनद्र्व्ये उपलब्ध होत नाही. अशावेळी पिक पानातील जे काही उपलब्ध अन्नद्र्वे आहेत ते बोंड वाढीसाठी व भरण्यासाठी वापर करतात त्यामुळे या दिवसात पाने पिवळी पडतात कालांतराने गळून पडतात.
उपाययोजना
२% डीएपी (२०० ग्रॅम) + मॅग्नेशियम @२० ग्रॅम + लिक्विड मधील सूक्ष्म अन्नद्र्वे @३० मिली/
किंवा
१२:६१:०० @७० ग्रॅम + मॅग्नेशियम @२० ग्रॅम + लिक्विड मधील सूक्ष्म अन्नद्र्वे @३० मिली
१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कापसाचे पाने पिवळी पडत असेल तरआठवड्यातून कमीत कमी दोन वेळेस वरीलप्रमाणे नियोजन करावे.
कीड रोग व्यवस्थापनासाठी सध्या अंट्राकॉल (प्रोपिनेब ७०%)@३० ग्रॅम+ शार्प,इनोव्हा टाटा माणिक (एसिटामाप्राईड) २०% @१० ग्रॅम+ टाटा बहार @३० मिली अशाप्रमाणे नियोजन करावे.
बोंडअळी असेल तर त्यात गरजेप्रमाणे इमामेक्टीन बेन्झोंएट ५% @१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.