त्यामुळेच पानावर जास्त कडकपणा आलेला दिसत आहे. केवळ प्रोफेनोफोस + रीजेंट+ ब्लू कॉपर जरी घेतला असता तरी अपेक्षित परिणाम मिळाले असते.
पातेगळ व्यवस्थापन
एकूण १० पाते संख्यातून केवळ ३-४ पाते झाडावर टिकून राहतात उर्वरित गळून पडतात.
गळून पडण्याचे कारण कमी सूर्य- प्रकाश, झाडामध्ये अन्नद्र्व्यासाठी निर्माण झालेली स्पर्धा पातेच्या ठिकाणी तयार झालेली अब्सेसीक थर अशी बरीच कारणे कारणीभूत ठरतात पातेगळ साठी.
जास्त प्रमाणात पातेगळ होत असल्यास २% डीएपी (२०० ग्रॅम/१० लिटर पाणीसाठी) सोबत प्लॅनोफ़िक्ष (NAA)@ ३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
महिन्यातून २-३ वेळा वरील प्रमाणे नियोजन करावे.
आता कोणती फवारणी घ्यावी
पातेगळ साठी नियोजन सांगितलेलं आहे त्यानुसार नियोजन करावे.
रस शोषक कीड व गुलाबीबोंड अळी नियंत्रण करिता क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली + हेक्झाकोनॅझोल ५%@३० मिली/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.