टमाटा लागवड विषयी मार्गदर्शन

मी 10:09 21 नवीन टमाटा लागवड करणार आहे तरी कोणती जात लागवड करावी आंतर पूर्वतयारी काय काय करावे योग्य मार्गदर्शन करा अगोदरची वावर मकाचे आहे खताचे नियोजन नियोजन

टोमॅटोचे प्रचलित असलेले वाण साई-२२ वाण लीफ कर्ल या रोगाला कमी बळी पडणारे वाणाची निवड करू शकता.
खत व्यवस्थापनात चांगले कुजलेले शेणखत एकरी @ ५ टन सोबत निंबोळी पेंड @८-१० बॅग याप्रमाणे जमीन लागवडीसाठी तयार करताना मिश्रण करून द्यावे.
गरजेनेनुसार जिवाणूजन्य स्लरीचे वापर करावा. (त्याबद्ल कृषी संवाद वेळोवेळी मार्गदर्शन करेल)

रासायनिक खत व्यवस्थापनमध्ये टोमॅटो पिकाला हेक्टरी १२०:६० : ६० (नत्र:स्फुरद:पालाश) ची शिफारस केलेली आहे.
परंतु आपल्या जमिनीमध्ये २५ % स्फुरदाचे प्रमाण वाढून दिल्यास फायदेशीर ठरते.

शिफारसपैकी ५० % खताचे डोस लागवडीपूर्वी बेड तयार करताना जमिनीत मिसळून द्व्यावे.
उर्वरित ५०% डोस विद्राव्येखत ठिबक मार्फत द्यावे.

विद्रावे खत व्यवस्थापन बाबत कृषी संवादची मदत घेऊन व्यवस्थापन करावे.