डाळिंब बहार काढून दोन दिवस झाले आहे

डाळिंब बहार पूर्ण होऊन दोन-तीन दिवस पूर्ण झाले आहे व रेस्ट पिरेड मध्ये झाडांना कोण कोणती खते टाकावीत याचे मार्गदर्शन करा सर पुढील वर्षी बहार धरणे पर्यंत योग्य नियोजन सांगा बागेवरती तेल्या आहे भरपूर प्रमाणात आहे झाडाची स्टोरेज व रोग प्रतिकारशक्ती चांगली वाढली पाहिजे

बागेची अवस्था ( ताण सोडणे )
अ) बागेची मशागत: पावसाळा संपल्यानंतर २०-२५ दिवसापर्यंत बागेला पाणी देऊ नये.
खताची मात्रा देताना बागेतील पडलेली पाने / कचरा काढून टाकावा अथवा जमिनीत पुरून टाकावा.
बागेतील झाडांना बसलेल्या ताणाच्या तीव्र्तेनुसार इथेफॉन चा वापर करून पानगळ करावी.
बेमोसमी पाऊस किंवा अन्य कारणाने झाडांना योग्य ताण बसला नसल्यास इथेफॉन ३९% SL च्या दोन फवारण्या कराव्या. पहिली फवारणी @०.९ मिली /लिटर या प्रमाणे व दुसरी फवारणी पानाच्या पिवळेपणानुसार @१ ते १.५ मिली/ लिटर या प्रमाणे पहिल्या फवारणी नंतर ५ ते ८ दिवसांनी करावी.

प्रत्येक इथेफॉन च्या फवारणीमध्ये १८:४६:०० किंवा १२: ६१ ०० किंवा ०:५२:३४ @ ५ ग्रॅम/लिटर या प्रमाणे मिसळावे.
खत व्यावाथापन बद्दल लवकरच माहिती देण्यात येईल.