चुरडा- मुरडा आहे या रोगाचा प्रसार फुलकिडे मार्फत होतो.
मिरची वरील चुरडा मुरडा रोगाचा प्रसार फुलकिडे व लाल कोळी या रस शोषक किडीमार्फत होतो.
कीड एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यास नियंत्रण मिळवता येईल.
१) शेतात एकरी @२० पिवळे - निळे चिकट सापळे प्रस्थापित करावे.
२)प्रादुर्भाव ग्रस्त झाडे त्वरित काढून नष्ट करावे.
३) लाल कोळी नियत्रण करिता प्रोपीगेट ५७% (ओमाईट ) @५० मिली किंवा सायनोपायराफेन 30 % SC (कुनोची)@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) फुलकिडे नियत्रण करिता फिप्रोनील ५% SC (रीजेंट) @ ३० मिली किंवा फिप्रोनील ८०% (जंप) @४ ग्रॅम किंवा सायंट्रॅनिलिप्रोल १०.२६% ओडी (बेनेविया) @४० मिली किंवा स्पिनोसॅड ४५% SC (ट्रेसर)@ मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५) फुलकिडे व कोळी एकत्रित नियत्रण करिता एथिओन ५० % EC @२० मिली किंवा फेन्प्रोपॅथ्रीन ३०% @१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.