टोमॅटो

टोमॅटो वरती व्हायरस आला, यावर काय उपाय आहे का ,?

पांढरी माशीमुळे या पिकावरील व्हायरसचा ( लीफ कर्ल) रोगाचा प्रसार होतो.
रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावी.
पांढरी माशी नियत्रण करिता शेतात एकरी @२० चिकट सापळे लावावे.
खालीलपैकी एका कीटकनाशकाचे वापर करून कीड नियंत्रणाचे उपाययोजना कराव्यात

अ) स्पायरोमेंसिफेन २२.९ %EC (ओबेरॉन )@१० मिली ,

ब) डायफ़ेथुरॉन ५० % WP (पोलो, पेगासस )@२० ग्रॅम,

क) इमिडाक्लोप्राईड १७.८ % SL(टाटा माणिक , कॉन्फिडर )@७ मिली

ड )असाटामाप्राईड २० % SP (शार्प , प्राईड, इनोव्हा )@3 ग्रॅम

या प्रमाणात वरील सर्व प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.