हुमणी साठी औषध काय आहे कारण हमला 2वेळा सोडून उसासाठी रोपांना सोडले पण तरीही फरक नाही हुमणी दिसत आहे तरी 100%खात्रीशीर फरक पडेल असे औषध सांगा
हुमणी किडीच्या प्रभावी नियंत्रण करिता मेटारायझिम अॅनिसोपिली @२ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
५-६ दिवसाच्या अंतराने क्लोथोडीयन ५०% WG (डेंटासु ) @१०० ग्रॅम/ किंवा इमिडाक्लोप्रिड ४० % +फिप्रोनील ४० % (लेसेन्टा)@२०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
वरील नियंत्रण करताना शक्यतो संध्याकाळी करावे.