गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन

कापूस पिकासाठी धोक्याची घंटा
सध्या बऱ्याच ठिकाणी कापूस पीक फुले व पाते अवस्थेत आहे व बऱ्याच ठिकाणी गुलाबी बोंड अळीचे प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. कापूस पिकावरील असलेली अत्यंत घातक कीड गुलाबी बोंड अळीचे पतंग कोष अवस्थेतून निघून मादी पतंग जवळपास ७०-१०० फुलात व पात्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अंडी घालतात. कापूस पट्ट्यात बऱ्याच ठिकाणी डोमकळी ग्रस्त फुले व अळी दिसत आहे. थोडक्यात गुलाबी बोंड अळीचे प्रादुर्भाव होताना दिसत आहे. या किडीचे नियंत्रण वेळीच करणे खूप गरजेचे आहे अन्यथा खूप मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल.

गुलाबी बोंड अळीसाठी नियंत्रणाचे उपाय
१) शेतात पिकांचे निरीक्षण करून डोमकळी ग्रस्त फुले तोडून नष्ट करावी. ( केवळ एक डोमकळी ग्रस्त फुल गुलाबी बोंड अळीची पुढच्या पिढीपासून होणाऱ्या प्रचंड नुकसान वाचवू शकते)
२) पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी एकरी @२० कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
३) पिकात सतत खोल डवरनी करावी त्यामुळे कोष अवस्थेत जाणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवता येईल.
४) प्रत्येक महिन्याच्या काळकुट्ट रात्री म्हणजेच अमावस्येच्या मागे पुढे एक दोन दिवस अंडीनाशक व सोबत निंबोळी अर्काची जोड देऊन फवारणी करावी.
अंडीनाशक कीटकनाशक
A) प्रोफेनोफॉस ५० % EC @२० मिली
B) थायोडीकार्ब ७५%WP @२० ग्रॅम
C) प्रोफेनोफॉस ४० % + सायपरमेथ्रीन ५%EC @२० मिली( वरील सर्व मात्रा प्रति १० लिटर पाणीसाठी दिलेली आहे)

५) वरील फवारणीनंतर एक आठवड्यानंतर अळीनाशकाची फवारणी करावी
जसे की,
अळीनाशक कीटकनाशक
अ)इमामेक्टिंन बेंझोएट ५%@१० ग्रॅम
ब) क्लोरान्ट्रॅनिलिप्रोल (१०%) + लॅम्बडॅसिहालोथ्रीन (५%) Zc@१० मिली
क) क्लोरान्ट्रॅनिलिप्रोल १८.५ %SC@ ३ मिली
ड) क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५%@३० मिली
इ) फेनप्रोपॅथ्रीन १०%@१० मिली.
वरील सर्व मात्रा प्रति १० लिटर पाण्यासाठी देण्यात आलेली आहे.
( गुलाबी बोंड अळीचे एकूण ४-६ पिढ्या असतात त्यापैकी दुसरी पिढी ही पोळ्याला व तिसरी पिढी सप्टेबर महिन्यात निघत असतात या दोन पिढी पासूनच कापूस पिकाला जास्त धोका असतो कारण याच कालावधीत पीक जोमात असते.)**

**

1 Like