ट्रायकोडर्मा आणि मेटारायझिम आले पिकास एकत्र दिली तर चालेल का?
दोन्ही एकत्र करण्यासाठी कोणत्याच विद्यापीठात अजून तरी त्यावर संशोधन झालेले नाही. तरी पण बरेच शेतकरी एकत्रित वापर करताना दिसत आहे व त्यांना त्याचा उत्तम परिणाम मिळत आहे. दोन्ही जैविक असल्याने पिकांवर किंवा जमिनीवर विपरीत परिणाम होणार नाही.
ट्रायकोड्रामा हे जैविक बुरशीनाशक कंद कुज व जमिनीतून उद्भवणाऱ्या रोगावर उत्तमरित्या नियंत्रण मिळवता येते.
मेटाऱ्हायझीयमचा उपयोग हुमणी या अळीवर केला जातो.