पाने

मिरची झाडाचे पाने पिवळी पडतात आणि पाने आतल्या बाजूला गुंडाळली आहेत

जुनी पाने पिवळी पडणे हे नत्राची कमतरतेची लक्षणे आहेत व पाने गुंडाळणे फुलकिडची लक्षणे आहेत.
नत्राची कमतरता भरून काढण्यासाठी व फुल कळीची संख्या वाढवण्यासाठी १३: ४० : १३ @५ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून प्रती एकरी ठिबक द्वारे सोडावे. तसेच फुलकिडे नियंत्रण करिता रिजेंट (फिप्रोनील ५% sc) @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.