सोयाबीन व तूर आंतरपीक

सोयाबीन मध्ये तूर हे आंतरपीक घेतले आहे, सोयाबीनची वाढ जास्त होत आहे, तर सोयाबीनची वाढ थांबवण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी.

पुरुषोत्तम जी सोयाबीन पिकाची वाढ थांबिण्यासाठी बाजारात लीहोसीन किंवा चमत्कार हे औषध मिळत असतात त्यांचा कीटकनाकांसोबत करावा त्यामुळे फवारणीचे अतिरिक्त खर्च वाचेल.

2 Likes

हे औषध वापरले तर चालेल का सर. याचा तुरी वर काही वाईट परिणाम नाही होणार ना.

तुरीवर फवारणी करू नका याचा वाढ थांबविण्यासाठी वापर केला जातो.

सोयाबीन पिकाला पाण्याची आवश्यकता आहे तरी सोयाबीनला पाणी द्यावे का तुषारने ?

हो संरक्षित पाणी देण्याची सोय करावी पुढचे काही दिवस हवामान कोरडे राहून पावसाची कमी शक्यता आहे.

तुरीला आता खत कोणते द्यावे.

आता फवारणी मार्फत खते देण्याची सोय करावी.
त्यासाठी ०.५२.३४@७० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुरीला फुले लागत आहे, तरी तुषार सिंचनाने पाणी दिले तर चालेल का

फुले किती प्रमाणात लागलेली आहे.