यावर उपाय सुचवा

कपाशी चे पिक वाढ होत नाही व वाळुन जात आहे

1 Like

आकाम्सित मर रोगाची लक्षणे आहेत. या रोगात पिकांची पाने एकदम कोमजून जातात म्हणजेच वाळून जातात, सतत पाऊस पडत असेल व जमिन थोड्याफार प्रमाणात पाणी धरून ठेवत असेल तर आकस्मित मर रोगाची लक्षणे दिसू लागतात.

उपाययोजना

  • मरग्रस्त झाडांचे शेंडे दोन्ही पायाच्या मध्ये घेऊन झाडाच्या बुडाजवळ घट्ट दाबावे त्यामुळे ढिल्या झालेल्या मुळ्या पक्की होतील.
  • प्रभावी नियंत्रण करिता २० ग्रॅम युरिया + २० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश + कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम/लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडाच्या बुडाला १५-२० मिली आळवणी घालावी.

पिकाच्या वाढीसाठी १९:१९:१९ @५० ग्रॅम + अमिनो अॅसिड@३० /१० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारणी करावी.

copper+humic 98% chi Driching kra