लिंबू

7 महिन्याची लिंबूनिचे रोपे आहे त्यावर हा रोग पडला आहे कोणता उपाय करावा

1 Like

पिकावर #नागअळी चे प्रादुर्भाव झालेले आहे व तसेच #लेमन butterfly दिसत आहे पानावर.
नर्सरी ते रोपे अवस्थेत या दोन्ही किडींचे प्रादुर्भाव दिसून येतो.
नियंत्रण :
डोळ्याने दिसणाऱ्या अळी हाताने वेचून नष्ट करावी.
बांधावरील पर्यायी खाद्य असलेल्या गुळवेल व वासन वेल काढून ती नष्ट करावी.
लेमन Butterfly साठी जैविक नियंत्रण करिता #Bacillus Thrugenesis@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
प्रभावी नियंत्रण करिता chloropyriphos 20%ec @३० ml/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

# नागअळी नियंत्रण करिता निंबोळी अर्क १०००० ppm @२० मिली + डायमेथोएट २०%EC( रोगर)@३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.