@पुरुषोत्तम जी प्रादुर्भावग्रस्त झाडांची फांदी काढून टाकावी त्यामुळे रोगाचा प्रसार निरोगी झाडांवर होणार नाही.
कस्टोडिया (#Azoxystrobin 11% + Tebuconazole 18.3 %SC)@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
@ पुरुषोत्तम जी अति पावसामुळे आणि पाणी साचून राहत असल्याने होत आहे. मूळकुज रोगाची रोगाची लक्षणे आहेत. जमिनीत वापसा अवस्था निर्माण झाल्यास एक हलकी कोळपणी करावी. त्यामुळे जमिनीतील हवा खेळत राहण्यास मदत होईल.
मूळकुज रोगाच्या प्रभावी नियंत्रण करिता #रोको (Thiophanate methyl 70 % WP)@३० ग्रॅम + ह्युमिक अॅसिड @४० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ट्रायकोडर्मा सोडला तर हा रोग नियंत्रण होईल का ?
हो होईल त्यासाठी १ किलो ट्रायकोड्रामा २ किलो गुळ आणि २०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे. ट्रायकोड्रामा
दिल्यानंतर ८ दिवस कुठलेही रासायनिक फवारणी किंवा आळवणी करू नये.