केसर आंबा लागवड

केसर आंब्याला दार वर्षी बहार येतो का. की काही 1 वर्षे आड

केसर आंब्याला दरवर्षी नियमित स्वरूपात मोहर येत नाही. एखाद्या वर्षी मोहर खूप अधिक येतो, तर एखाद्या वर्षी साधारण येतो. ज्या झाडांना एक वर्षाआड मोहर येतो, त्या झाडांत जीएचे प्रमाण अधिक असते. आंब्याच्या झाडाला नियमित मोहर आणण्यासाठी वाढनियंत्रकाचा म्हणजे पॅक्‍लोब्युट्रॉझॉल वापर करणे फायदेशीर ठरते.

वापरण्याची वेळ
पॅक्‍लोब्युट्रॉझॉल देण्याची वेळ ही आंब्यास सर्वसाधारण मोहर येण्याच्या तीन ते साडेतीन महिने अगोदर असते. आपल्याकडे आंब्यास सर्वसाधारणतः डिसेंबर-जानेवारीत मोहर येतो. म्हणजे त्या अगोदर तीन-साडेतीन महिने हा कालावधी 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर येतो. या काळात आपल्याकडे त्याचा वापर करावा.

1 Like

खूप खूप धन्यवाद🙏