उन्हाळी भुईमूंग लागवाड बद्दल महिती दया

खत व्यवस्थापण ,अंतर पिक, जमीनी ची निवड वाण निवड , बिज प्रक्रिया या बद्दल महिती द्या

@ विलासजी उन्हाळी भुईमुग पेरणीची योग्य कालावधी १५ जानेवारी ते १० मार्च पर्यंत करावे.
खत व्यवस्थापन
युरिया: २५ किलो + सिंगल सुपर फॉस्फेट १०० किलो + म्युरेट ऑफ पॉटास ४० किलो + जिप्सम १०० किलो + झिंक सल्फेट ४ किलो टाकावे.
अंतरपीक: सरीमध्ये कोथिंबीरची लागवड करू शकता किंवा दुसरे कमी कालावधीचे भाजीपाला घेउ शकता.
जमिनीची निवड : शेंद्रीय पदार्थ ची योग्य मात्र असलेली, उत्तम पाण्याची निचरा होणारी जमिनीची निवड करावी.
वाण निवड
उन्हाळी भुईमुग लागवडीसाठी महाराष्ट्रमध्ये प्रामुख्याने उपट्या जातीची निवड करतात.
त्यामध्ये SB -११ , TG-२४, फुले उन्नती, JL-२४,७७६ या जातीची निवड करतात.
तुमच्या विभागात कुठल्या जाती मिळतील त्याची विचारपूस करून लागवड करावी.

बीजप्रक्रिया
थायरम @५ ग्रॅम + ट्रायकोड्रामा @५ ग्रॅम/किलो या प्रमाणे बीजप्रक्रीया करून पेरणीपूर्वी अर्धा ते १ तास वाळत ठेवावे.

कीड रोग व्यवस्थापनासाठी फार्मप्रीसाईज अॅप्प चा सल्ला घ्यावा.

धन्यवाद