कांदा

कांदा लागवड करुन 1महिना झाला कोणते खत वापरावे

लागवड करताना कोणती खते वापरली होती?

24 24 00

कांदा खत व्यवस्थापन देत आहे ,तुमच्या पिकाच्या अवस्थेनुसार खत नियोजन करण्याचे ठरवा.

कांदा खत व्यवस्थापन**
कांदा पिकासाठी हेक्टरी १०० :५० :५० (नत्र, स्पुरद व पालश ) शिफारश केलेली आहे.

एकरी (४० :२०:२०)

पेरणी /पुनर्लागवडी दरम्यान एकरी (२० :२०:२० ,नत्र, स्पुरद व पालश ) म्हणजेच ५० किलो DAP, ४० किलो MOP आणि ४० किलो युरिया पेरणी दरम्यान द्यावे.

उर्वरित २० किलो नत्र म्हणजे ४० किलो युरिया ३० व ४५ दिवसांनी विभागून द्यावे.

रब्बी कांदा पुनर्लागवडी पूर्वी गंधक एकरी@ १५ ते २० किलो या प्रमाणात मातीत मिसळून द्यावे.

कांदा पोसणी साठी व आकर्षित रंगासाठी*

१ ) लागवडी नंतर ६० दिवसांनी @(१९:१९ :१९)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

3 )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.