आबा

काय काळजी घ्यावी,फळ पिवळे होऊन गलत आहे

1 Like

तापमानातील चढ-उतारामुळे आंब्याला पुन्हा पुन्हा मोहोर येतो. साधारणपणे ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये मोहोर येऊन फळे मोठी होऊन जानेवारी- फेब्रुवारीत अचानक थंडी पडल्यास त्याच मोहोराच्या बगलेतून पुन्हा मोहोर येतो. अशा वेळेस पहिल्या मोहोरातील मोठी फळे अन्नसाठा बंद झाल्यामुळे गळून पडतात. नैसर्गिक गळ रोखण्यासाठी नॅप्थेलिक ऍसेटिक ऍसिड NAA (प्लनोफ़िक्ष)@3 मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करवी. काही वेळेस सायटोकायनिन या संजीवकामुळे फळगळ थांबविणे शक्‍य होऊ शकते. कारण सायटोकायनिनमुळे ऍबसेसिक ऍसिड या वाढ निरोधकाची उत्पत्ती झाडामध्ये थांबविली जाऊन फळाच्या देठाभोवती होणारी ऍबसेसिक पेशींची वाढ बंद होते. पर्यायाने फळ गळ रोखता येते.

आंबा पिकावर फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत तुडतुडे रसशोषक किड व भुरी रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी थायमिथाॅक्झाम २५% WDG (actra)@५ ग्रॅम + सल्फर ८०% WP @३० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

थोड्याफार प्रमणात भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे वरील सांगितल्या प्रमाणे नियोजन करावे.