ओंबी जवळील पान जळत आहेत ते कशामुळे ?? आणि त्यासाठी काय करावे लागेल . पेरणी तारीख 23/11/2020 आहेत आणि 20 दिवसापूर्वी m45 + रोगर + टॉनिक फवारणी केली होती मग आताची फवारणी कशाची करायची हे पण सांगा .असे केले तर चालेल का m45 + जिबरेलिक अॕसिड + 00 52 34
जिबेरलिक अॕसिड गहू पिकात वापरत नाही. m45 (मोन्चीकॉझेब ७५% WP) याआधी फवारणी केल्याने आता तेच बुरशीनाशक पुन्हा फवारणीसाठी वापरणे श्यक्यतो टाळावे. पिवळा तांबेरा रोगाची लक्षणे दिसत असेल, पिवळा तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपिकॉनाझोल २५% EC (Tilt) @१० मिली व सोबत 00 52 34@५० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिवळा तांबेरा रोगाची लक्षणे आहेत. नियंत्रणाचे उपाय सांगण्यात आलेले आहे.
धन्यवाद !
मला आताच्या अवस्थेत टॉनिक घेण्याची आवश्यकता नाही का ??किंवा कोणते घेऊ शकतो
टॉनिक घेण्याची आवश्यकता नाही त्या ऐवजी ०.५२५.३४ किंवा ०.०.५० विद्राव्ये खत @५० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करू शकता.