कपाशी वरील मित्र कीड

:point_up_2:t2::point_up_2:t2::beetle::beetle: ढाल किडा, लेडी बर्ड बीटल म्हणजेच शेतकऱ्यांचा मित्र कीड जो आपल्या जीवनात एकूण 250-300 रस शोषक किडी फस्त करतो (मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे) त्यामुळे कापूस पिकावर फवारणी करताना पहिलीच फवारणी कीटकनाशकाची न करता ५% निंबोळी अर्काची करावी जेणे करून मित्र किडीला कुठलाही धोका होणार नाही, आणि जर दुसरी फवारणी करायची असेल तर अती कमी विषारी कीडनाशकांची फवारणी करावी. या मुळे किडीची प्रतिकार क्षमता वाढणार नाही, फवारणी वरील अतिरिक्त खर्च टाळता येईल पर्यावरणाचा समतोल राखता येईल. मित्र किडिची संख्या समतोल ठेवता येईल. *

कीटकनाशके* विषारीतेचे *क्रम खालील प्रमाणे:
१):red_square: ( लाल) :अती विषारी
२):yellow_square: ( पिवळा) : मध्यम विषारी
३):blue_square:( नीळा) :विषारी
४):green_square:( हिरवा): कमी विषारी

सचिन आढ़े
:droplet::droplet: Watershed Organization Trust, Pune :ear_of_rice::ear_of_rice::ear_of_rice::droplet::droplet::droplet::droplet:

4 Likes