रासायनिक अंश किती दिवस असता

काढणी ला आलेला भाजी पाला यावर औषध फवारणी केली असता त्यांचे अंश किती दिवसापर्यत असता. उदाहरणार्थ वरील फोटोत दाखविल्याप्रमाणे वालाच्या शेंगा काढणी साठी तयार आहेत मग रोगर फवारणी केल्यावर दोन ते तीन दिवसांनी तोडणी करू पण त्यामध्ये त्या औषधाचे अंश किती दिवस राहतील आणि त्याचा मानवी आरोग्य वर काय परिणाम होईल

3 Likes

औषध शेंगामधे 5ते6 दिवस राहणार आणि आरोग्यावर पाहिजे तसा कठीण परीनाम होनार नाही. कारण आपण ते शिजवून खात आसतो

शिजवल्यानंतर देखील काही कमी प्रमाणात अंश राहतीलच असे वाटते

तज्ञमंडळी यांनी लवकरात लवकर मार्गदर्शन करावे हि माफक अपेक्षा

bhagainath जी कुठले पण कीटकनाशक एका ठराविक वेळेपर्यंत फळामध्ये किंवा पिकामध्ये राहतात. फवारणी केल्यानंतर प्रत्येक कीटकनाशकाचा Waiting period असतो तेवढ्या कालावधीत पालेभाज्या किंवा फळे काढणी करणे थांबवावे.