ढगाळ वातावरणाचा गहू पिकावर होणारा परिणाम आणि उपाययोजना

गहू पिक संरक्षणासाठी उपाय सांगा 40 दिवसाचे पिक झाले आहेत उपाययोजना हि कमी खर्चीक असेल तर आधिक उत्तम

1 Like

ढगाळ वातावरणामुळे , तसेच सतत धुके व दव पडल्याने पानावर पाणी साचलेले असतात त्याच वेळी तांबेरा रोगाचे प्रादुर्भाव करणाऱ्या बुरशीची वाढ होऊ शकतात. त्यामुळे १०-१५ % उत्पन्नात घट येते.
कमी खर्चिक उपाययोजना साठी सकाळी धुके असताना गहू पिकाच्या आजूबाजूला किंवा बांधावर ठिकठिकाणी काडीकचरा जाळून धूर करण्याची सोय करावी. असे आठवड्यातून 3-४ वेळा करावे.
एक प्रतिबंधक फवारणी म्हणून मोन्कॉझेब ७५ % WP @३० ग्रॅम + ०: ५२: ३४ विद्राव्ये खत @५० ग्रॅम/ १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

धन्यवाद सर