प्रदीप

दोडक्याच्या कळ्या पिवळे पडत आहे उपाय सांगा

प्रदीप जी फळ माशी च्या प्रादुर्भावाने नवीन येणारे तोडके अशी होत होत आहे.
बाजारात फळ माशी सापळे मिळतात एकरी @२० फळ माशी सापळे लावावे.

किंवा घरी तयार करा.
फळ माशी आकर्षित करण्यासाठी बाजारात मिथिल युजेनोल किंवा क्यूलुअर हे रासायनिक द्रव्ये बाजारात मिळतात.रुंद तोंडाच्या बाटली मध्ये किंवा जाळीदार डब्यात सापळा तयार करावा, त्यामध्ये लोखंडी तारेला किंवा खिळ्याला कापडी वात गुंडाळून बोला तयार करावा. बोळा मिथिल युजेनोल द्रावणात बुडवून ठेवावे किंवा २ ते 3 मिली द्रावण मिरजावे.

द्रावण तयार केलेले सापळे पिकाच्या अवती भोवती लावावे. या सापळ्यात फळ माशी अर्कार्षित होऊन नियंत्रण मिळते.