रोग व्यवस्थापन

बटाट्याची पाने पिवळी पडून कोलमडत आहेत यावरील उपाय सांगा

कीड व रोग व्यवस्थापन :
छाया ताई मागील काही दिवस व या आठवड्यात बरेच दिवस ढगाळ वातावरण असल्याने रस शोषक किड जसे कि मावा ,तुडतुडे आणि पांढरी माशी चे प्रमाण वाढले असतील त्यामुळे पाने थोडी पडलेली व वाकडी झालेली दिसत आहे, त्याचबरोबर काही प्रमाणात लवकर येणारे करपा चे प्रमाण दिसत आहे.
रस शोषक कीड व करपा नियंत्रणासाठी
थायमेथोक्झाम २५% WDG (अॅकटरा )@१० ग्रॅम सोबत प्रोपीनेब ७०% WP (अॅन्त्राकोल )@३० ग्रॅम / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
दिवसाच व रात्रीच तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी संध्याकाळी पिकाच्या बाजूला धूर करावे.