बटाट्याची पाणी कोलमडून पिवळी पडत आहे यावरील उपाय सांगा
1 Like
छाया जी फोटो अपलोड करा
मागील काही दिवस व या आठवड्यात बरेच दिवस ढगाळ वातावरण असल्याने रस शोषक किड जसे कि मावा ,तुडतुडे आणि पांढरी माशी चे प्रमाण वाढले असतील त्यामुळे पाने थोडी पडलेली व वाकडी झालेली दिसत आहे, त्याचबरोबर काही प्रमाणात लवकर येणारे करपा चे प्रमाण दिसत आहे.
रस शोषक कीड व करपा नियंत्रणासाठी
थायमेथोक्झाम २५% WDG ( अॅकटरा )@१० ग्रॅम सोबत प्रोपीनेब ७०% WP ( अॅन्त्राकोल )@३० ग्रॅम / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
दिवसाच व रात्रीच तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी संध्याकाळी पिकाच्या बाजूला धूर करावे.