कपाशीचे शेत खाली झाले त्या शेतात हिरवळीचे खत तयार करायचे आहे

हिरवळीच्या खतासाठी कोणत्यापिकांची पेरणी करावी

1 Like

महाधु जी खूप छान निर्णय घेतलाय तुम्ही अभिनंदन.

हिरवळीचे खते तयार करण्यासाठी वापरणे पीक
१) ताग, बरू
२) धेंचा,
३) घेवडा,
४) मूग, उडीद,
५) गिरीश पुष्प .सेंजी
अशी वरील बरीच पिके घेता येतात पण
आपल्या भागात मूग, ताग किंवा बरु हे पीक घेता येईल.
शक्यतो मूग हिरवळीचे खत तयार करण्यासाठी सोप आणि फायद्याचे राहील.
मूग पीक जेव्हा फुलोरा अवस्थेत राहील त्या नांगराच्या सहायाने किंवा रोटा वेटर च्या मदतीने पीक जमिनीत गाडून टाकावे.
हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो. त्या साठी शक्य असल्यास स्पिंकलर ने पाणी सोडून खत कुजवून घ्यावे.
व काही दिवसांनी वापसा अवस्थेत नांगराच्या सहायाने जमीन ची पलटी करावी.

धन्यवाद सर