खत व्यवस्थापन बद्दल माहिती द्या

ट्रायकोडर्मा हिरी डी बुरशी नाशक वापरावे का ? ते कधी वापरावे? व कसे वापरावे? स्प्रे द्वारे दिले तर चालेल का? आठ दिवस झाले आहेत रोप लागवड करून खत व्यवस्थापन बद्दल माहिती द्या

1 Like

@ विलास जी शक्यतो पुनर्लागवडी दरम्यान रोपांची मुळे (रूट) ट्रायकोड्रामा व्हीरीडी या जैविक बुरशी नाशकाच्या द्रावणात बुडूवून लावायला पाहिजे त्यामुळे नर्सरी अवस्थेतील रोपे कोलमडणे ची समस्या उद्भवत नाही.
आता फवारणी द्वारे झायनेब ७५ % WP (इंडोफिल झेड -७८ ) @३० ग्रॅम + हूमिक अॅसिड @२० मिली या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.

कांदा खत व्यवस्थापन
कांदा पिकासाठी हेक्टरी १०० :५० :५० (नत्र, स्पुरद व पालश ) शिफारश केलेली आहे.
एकरी (४० :२०:२०)
पेरणी /पुनर्लागवडी दरम्यान एकरी (२० :२०:२० ,नत्र, स्पुरद व पालश ) म्हणजेच ५० किलो DAP, ४० किलो MOP आणि ४० किलो युरिया पेरणी दरम्यान द्यावे.
उर्वरित २० किलो नत्र म्हणजे ४० किलो युरिया ३० व ४५ दिवसांनी विभागून द्यावे.
रब्बी कांदा पुनर्लागवडी पूर्वी गंधक एकरी@ १५ ते २० किलो या प्रमाणात मातीत मिसळून द्यावे.

कांदा पोसणी साठी व आकर्षित रंगासाठी
१ ) लागवडी नंतर ६० दिवसांनी @(१९:१९ :१९)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
3 )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.