कांदा सेंद्रिय खतापासून उत्पादन वाढेल का?

कांद्याला सेंद्रिय खत कोणते व किती दिवसात तयार होते त्याचा उपयोग कसा करावा.1एकर कांदा आहे…सेंद्रिय शेतीमुळे कांद्याला चांगला भाव येईल का?

1 Like

सागर जी केवळ शेंद्रीय वापरून उत्पादन वाढणार नाही शेंद्रीय व रासायनिक खतांची (५०:५०) वापर करून उत्पादनात वाढ करता येईल.
शेंद्रीये मध्ये जीवामृत ,अमृत पाणी वापरून उत्पादनात वाढ करता येईल.

**जीवामृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य ** :
१) देशी गाईचे शेण १० किलो
२)देशी गाईचे गोमुत्र १० लिटर
3)डाळीचे पीठ ( तूर ,मुग ,हरभरा या पैकी ) २ किलो
४) २ किलो गुळ
५) १८० लिटर पाणी
६ ) प्लास्टिक टाकी (२०० लिटर क्षमता असलेली )

कृती
२०० लिटर क्षमतेचा ड्रम घ्यावा. सावलीच्या ठिकाणी वरील सर्व साहित्य एकत्रित ड्रम मध्ये मिसळावे व झाकून घ्यावे मिश्रण दररोज सकाळ- संध्याकाळ काठीच्या सहाय्याने उजवीकडून डावीकडे तसेच डावीकडून उजवीकडे ढवळावे. अशी क्रिया ५-७ दिवसापर्यंत करत राहावे ७ दिवसानंतर (एका आठवड्यानंतर ) जीवामृत वापरण्यास तयार होते.
वापरण्याचे प्रमाण :
२०० लिटर तयार झालेले द्रावण (जीवामृत) पिकांना पाणी देताना सरी (पाटाद्वारे ) बरोबर जमिनीत ओल असताना पिकाच्या मुळाशी अवल्नी घालावी. ( जीवामृत प्रत्येक १० दिवसांनी आवळणी घातल्यास जमिनीची सुपीकता वाढते)

कांदा खत व्यवस्थापन**

कांदा पिकासाठी हेक्टरी १०० :५० :५० (नत्र, स्पुरद व पालश ) शिफारश केलेली आहे.

एकरी (४० :२०:२०)

पेरणी /पुनर्लागवडी दरम्यान एकरी (२० :२०:२० ,नत्र, स्पुरद व पालश ) म्हणजेच ५० किलो DAP, ४० किलो MOP आणि ४० किलो युरिया पेरणी दरम्यान द्यावे.

उर्वरित २० किलो नत्र म्हणजे ४० किलो युरिया ३० व ४५ दिवसांनी विभागून द्यावे.

रब्बी कांदा पुनर्लागवडी पूर्वी गंधक एकरी@ १५ ते २० किलो या प्रमाणात मातीत मिसळून द्यावे.

कांदा पोसणी साठी व आकर्षित रंगासाठी

१ ) लागवडी नंतर ६० दिवसांनी @(१९:१९ :१९)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

3 )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.