लष्करी आळीचा प्रादुर्भाव

मका वरील लष्करी अळी वरील नियंत्रण कसे करावे

2 Likes

लष्करी अळी नियंत्रणासाठी पीक १५ ते २५ दिवसाच्या अवस्थेत असताना अळी पानाच्या खाली पूंजक्यात अंडी घालते ती गोळा करून नष्ट करावी, अळी ची मोठी अवस्था दिसताच हाताने वेचून नष्ट करावी, अमेरिकन लष्करी अळी एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी हेक्टरी @५० कामगंध सापळ्यांचा वापर करावा,

लष्करी अळी जैविक नियंत्रना करिता मेटारायझियम अनीसिपोली, बिव्हेरिया ब्यासिना @ ५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व तसेच
रासायनिक कीटक नाशके द्वारे प्रभावी नियंत्रणासाठी Dichlorovos ७६%इसी @३०मिली /प्रति पंप पोंग्यात फवारणी करावी. हे कीडनाशक गॅस पॉइझन असल्याने बऱ्या पैकी प्रादुर्भाव कमी करता येईल , व लगेच ८ दिवसाच्या अंतराने Chloratranilprole (10 %)+ Lambdacyhalothrin (5%) ZC ( Ampligo) @१० प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

fawarni करताना फवारा पोंग्यात पडेल याकडे लक्ष द्या कारण अळी पोंग्यत असते